Surprise Me!

KolhapurNews | डेट पाम उर्फ खजूराचे निवळेजर्द घोस लगडले...!

2021-04-28 73 Dailymotion

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग ऍन्ड पॉलिटेक्‍निक येथील बाग आणि परिसरात डेट पाम उर्फ खजुराची पक्व अन्‌ गोड अशा फळांचे घोस अक्षरश: लगडले आहेत. या खजूराच्या झाडांना पाहिले की, पिवळेजर्द असे घोस जागोजागी दिसतात. हा खजूर पक्व ही झाला आहे. अतिशय साखर अन्‌ गुळासारखी गोड अशी ही फळे आहेत. पाच वर्षांपूर्वी आखाती देशातून आमदार ऋतुराज पाटील यांनी ही खजूराची झाडे आणली. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लावली. आज या खजूराला अगणित अशी फळे आली आहेत. डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यातून इंजिनिअरिंग कॉलेज परिसर खजूराच्या झाडांना बहरुन गेला आहे. उष्ण कटीबंधातील आखाती देशात असे खजूर मिळतात; पण आपल्या परिसरात हा खजूर अशा पद्धतीने बहरुन येणे हे विशेष आहे. <br /><br />रिपोर्टर : अमोल सावंत <br />व्हिडीओ जर्नलिस्ट : नितीन जाधव

Buy Now on CodeCanyon